रुताया लागली ही जाळी आठवणीची मनाला,
गुंतलो गेलो तुझ्या जाळ्यात मी सारा...
न म्हणाया धागा ही जोडणारा तुटला,
अजूनही आहे अडकला धाग्यात जीव बिचारा....
रडून उघडली धरणे दाट पापण्यांची
आटली हुंदके पसरला दुष्काळ हा खरा....
छबी डोळ्यात तुझी दिसते स्पष्ट जरी
डोळे वेडावले नीज दे डोळ्यात तू जरा.....
का गेली दूर एवढा लावून लळा
एकटे सारे जग आता वाटे मजला ......
दमलो खूप सारा श्वास अर्धा उरला
बघून तुझी वाट हा पुरा देह झिजला .....
हा जन्म नव्हता आपला बहुतेक तसा
मी हि एकटा तू हि तशीच एकटी झुरली ....
आता वाट फक्त त्या पुढल्या जन्माची ...
अखेर तीच वेडी आशा नुसती उरली ......
अखेर तीच वेडी आशा ती नुसती उरली ...... :(
........ मंदार बापट
khup chan mandar :)
dhanyawad Ganesh
अप्रतिम कविता आहे! :) :) :)
Dhanyawad मिलिंद
khup chan
thanks Sagarika
khup chan
dhanyawad Ram
khup chan..
dhanyawad Shrikantji