___आज रात्रभर जागायचंय___
आज रात्रभर जागायचंय
आज तुला आठवायचंय
तुझ्या आठवणींत रमायचंय
आज रात्रभर जागायचंय
तुझ्याशी थोडं बोलायचंय
मन मोकळ करायचंय
तू नाहीस म्हणून रडायचंय आज रात्रभर जागायचंय
तुला थोडं हसवायचंय
मलाही थोडं हसायचंय
तुझ्या डोळ्यांतलं हास्य पाहत आज रात्रभर जागायचंय
तुझ्यावर थोडं लिहायचंय तुला शब्दांत मांडायचंय लिहीलेलं तुला दाखवायचंय आज रात्रभर जागायचंय
© कौस्तुभ (मी शब्द वेडा)
chan
thanks