अजून काळोख आहे अजून रात्र आहे
रात किड्यांची बडबड काजवांच सुत्र आहे
दुर दूरवर कुठे भुंकतय कुत्र आहे
आवाजाला घाबरनारा मी एक मात्र आहे
भिती वाटते कापतय अंग अहोरात्र आहे
भुतां पेक्षा माणसच वाईट कानमंत्र आहे
जनावरांची भिती नाही चावण्यास पात्र आहे
मी माणसांना भितो त्यांच्याकडे शस्त्र आहे
माणूस दीसला नाही मी पाहतो सर्वत्र आहे
अजून काळोख आहे थोडा अजून रात्र आहे...
विघ्नेश जोशी...
छान....
अजून काळोख आहे थोडा अजून रात्र आहे...
छान.... :) :) :)