असा ही वसंत
नमून पळसाच्या कळसा
घालून पिंपळाला वळसा ---
पळता पळात सरली वाट
आला झुळ-झुळ नदीचा काठ ---
वटाच्या जटा खेळ सूर-पारंब्यांचा
वास तेथे गोड रसाळ आंब्यांचा ---
अशोकाने हात टेकले आभाळा
गवताने हात मारले कपाळा ---
घातल्या अमलताशाने पिवळ्या माळा
लागला गुलमोहोराचा लळा ---
डांगर मळ्याची हिरवळ , लपली हरळ
वांगड डोईची शिरवाळ , गेली मरळ
टिटवीचा गजर -- कोकिळेची हाक
वसंताची नजर -- सरला शिशिराचा धाक
----------------