गुलाब छटा
फुलांच्या राजा गुलाबाच्या फुला
विविध रंगी तुझ्या छटा
सलगी करतो कुंपण काटा
बालपणी हस्त बाल्य
गाली उमलती लाल गुलाब
गुलाबाच्या फुला विविध रंगी तुझ्या छटा
यॊवनांत हि येता युवती
लज्जेनी फुलती गाली गुलाबी गुलाब
गुलाबाच्या फुला विविध रंगी तुझ्या छटा
तारुण्याच्या शिखरावरती
प्रेमनिशाणी असे गुलाब
गुलाबाच्या फुला विविध रंगी तुझ्या छटा
वृद्धपणी येता वार्धक्य
दोन ध्रुवावर दोन गुलाब
परी ऒषधासी गुलकंद गुलाब
गुलाबाच्या फुला विविध रंगी तुझ्या छटा
निसर्गातल्या राज फुला तू
नंदनवनचा काश्मिरी गुलाब
साजिरा गोजिरा गुलाबांचा गुलाब
गुलाबाच्या फुला विविध रंगी तुझ्या छटा
सलगी करतो कुंपण काटा
सौ . अनिता फणसळकर
छान :)