आज तु आणि मी आपण दोघं
उद्या नसेलही हे कदाचित असेच सर्व
कितीही प्रेम असले तरी
भांडणे ही होणारच
कोणी किती मनावर घ्यायचे
हा प्रश्न राहणारच
आज मी नमत घेतलं
तर तु घेणार नाहीस
उद्या तु नमत घेतलं
तर मी घेणार नाही
आणि मग हे सर्व
असेच चालू राहील
आणि तीच कदाचित आपली
शेवटची भेट होईल....
नाती हि अशीच असतात
कधी सहज सोपी
तर कधी गुंतागुंतीची होतात
गुंता सोडवायला आपल्यालाच
प्रयत्न करायला हवा
सारेकाही विसरण्याचा
विचार तरी करायला हवा
नाहीतर गुंता असाच वाढत जाईल
आणि तीच कदाचित आपली
शेवटची भेट होईल....
कधीकधी मनात
तसकाही नसतही
अचानक आलेला राग
चटकन जातोही
कोणीतरी स्वताहून
माघार घ्यायलाच हवी
नाहीतर मीच का घेऊ
ह्यातच वेळ जाईल
आणि तीच कदाचित आपली
शेवटची भेट होईल....
म्हणून मीच तुला आता
म्हणतो I am sorry
मी तर घेतली आता
तुही माघार घ्यावी
नाहीतर आपले हे नाते
असेच तुटून जाईल
आणि तीच कदाचित आपली
शेवटची भेट होईल....
शेवटची भेट होईल....
... प्राजुन्कुश
... Prajunkush.