चारोळ्या
खरंच तेव्हा सांगायच
होत नव्हतं धाडस
माझ्या गोजिरवाण्या स्वप्नातलं
तु एकुलतं एक पाडस....
.
.
.
.
.
नको येवु स्वप्नात पुन्हा
रात्री माझ्या जागवायला
श्वासही तोडके पडतात
स्पंदनं ह्र्दयीचे वागवायला.....
.
.
.
.
.
एकदा जाऊन सांगच तीला
प्रेम करतो खुप तुझ्यावर
वेळ निघुन गेल्यावर मात्र
जगत बसशील आज-उद्यावर ......
.
.
.
.
.
एकदा सत्य म्हणालं स्वप्नाला
किती रे तुझी मिजास
रोज घडतो तुझ्यातुन
तरीही मन माझं उदास ...
.
.
.
.
.
आभाळाशी भिडतो तेव्हा
तारेही तुटतात .....
जेव्हा आपल्या स्वप्नांच्या
पाउल खुणा भेटतात ....
-विनोद पाटील
आज तुझि आठवण येतां
मुक होइ वाचा
भावफुले उमलुन येता
तुटे बंध संयमाचा-क्रुष्णकुमारप्रधान
छान... :) :) :) :)