बाळ्याच्या हाती TV चा रिमोट दिला।
अन तो कार्टून चा कार्टूनिस्ट झाला
Tom & jerry याचे सगे सोयरे
छोटा भीम बालि म्हणे होय रे।।
बाळ्या मिकीचे शेपूट ओढतो।
कधी भीमाची गदा मोडतो
खट्याळ बाळ्या गिल्ली डंडा खेळतो
नर्सरीत आहे पण रोपटी तोडतो।।
कॅानवेंटची बाराख़डी ninja ला शिकवितो।
डोरेमॅानचा शो पाहून सर्वांना हसवतो
ABCD ben ten ची बाळ्याला जमते छान
कौतुक करता त्याचे येतोय त्याला मान।।
खेळात बनतो साऱ्यांचा तो गुरु।
नाव काढताच कुणी मारायला करतो सुरु
चुलबुल पांडे हा धावतो तुरु तुरु
बाळ्या आमचा छान बोलतो चुरु चुरु।।
- राहुल रा. पाटिल
दि: २० जुलै २०१३
नर्सरीत आहे पण रोपटी तोडतो।।... :D :D :D
rahul,
chan aahe balgeet... :)
:D :D मस्तच आहे