समुद्र रुसला तर माशानी कसे जगायचे
मेघ रुसला तर शेतानी कसे पिकायचे
सूर्य रुसला तर दिवसाने कसे उगवायचे
वारा रुसला तर सुगंधाने कसे पसरायचे
सुगंध रुसला तर कळ्यानी कसे दरवळायचे
वसंत रुसला तर आम्राने कसे मोहरायचे
आम्र रुसला तर कोकिळेने कसे गायचे
निसर्गच रुसला तर माणसाचे कसे व्हायचे