करमत नाही पाहिल्यासारखे
आता दिवस हि मोठा वाटतो
रात्रीचा हा अंधार कहर बनून माझ्यावरच गरजतो ........
पुसतो मी आठवणी
तरी आठवणी मला छळतात
कधी तर तो मेघांचा पाऊस माझ्या डोळ्यांमधूनच बरसतो ......
करमत नाही आता सये तू सोबत नसतेस
थरथरतात हे हात
आता त्यांना धरायला तू नसतेस
आक्रंदतात विचारांचा तो स्वर कानी माझ्या
मग नयन हि माझे अश्रू बनून बरसतात.......
करमत हि नाही सये आता जगवत हि नाही
एकटे माझी पहाट करणारा तो प्रेमसुर्य माझा
पूर्वीसारखे आता उगवत हि नाही .......
तुला हि कळत असेल क्षणोक्षणी दुख माझे
बांधली होती नाती आपण दोघांनी भावनांचे
डोळे ही अंधुक झालेत
येईल ती रात्र सये अंधारात मला सामावायला...........
पाहून घेशील का एकदा अखेरचे
निघून ये रुसवा सोडून आता
मी मोकळा होइल गं श्वास माझा सोडायला ..............
-
लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•
दि .०६-८-२०१३
खुपचं छान.... प्रशांत दादा
खुपचं छान.... प्रशांत दादा
dhanyvad akshayji