का कधी कुठे आणि कशी,
तुझी माझी भेट झाली,
नकळत जिवलग मैत्रीण बनुन,
तु माझ्या जिवनात आली.....
तुझ्या सोबत खुपकाही बोलायचो,
तुझे मधाळ बोलणे ऐकायचो,
कळलच नाही गं बघता बघता,
तु माझी स्वप्नातली परी झाली.....
तुझ्या रुसण्यात ही प्रेम दिसायचे,
मी मिठीत घेताच तु गोड हसायचे,
मी i love u बोलताच लाजेने चूर व्हायचे,
तु माझी मैत्रीण न राहता प्रियासी झाली.....
तुझेच विचार असायचे मनात,
लक्ष लागतच नव्हते कामात,
तुला भेटण्यास आतुर व्हायचो,
तु मात्र प्रत्येक वेळी उशीराच आली.....
येताच निघण्याची घाई करायची,
मी थांब म्हणताच नकट्या नाकाने रागवायची,
आपण पुन्हा भेटूच ना रे असे बोलायची,
तु क्षणातच निघून गेली.....
पुन्हा फोन करुन मला चिडवायची,
आपण लवकरच भेटू बोलायची,
अन् कधी न भेटण्यासाठी,
सारखी टाळाटाळ करु लागली.....
आज कदाचित मी तुझा कोण लागत नाही,
पहील्यासारखं तु आता मला पाहत नाही,
माझी खुपकाही लागत असताना,
तु मात्र सोडून दुस-याची झाली.....
एक क्षणही आता करमत नाही तुझ्याशिवाय,
लक्ष ही आता कुठेच लागत नाही,
एकटा पुर्णपणे तुटून पडलोय मी,
न सांगताच का तु मला सोडून गेली.....
न सांगताच का तु मला सोडून गेली..... :'( :'( :'(
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)
- सुरेश सोनावणे.....