आभाळ
आभाळ्यातल्या चांदण्या थेंबांच्या
रूपाने अलगद जमिनीवर येतात
तेथे हिरवयीने नटलेल्या पाचूंची
विपुल बने फुलवून जातात
नभातली लाख लाख नक्षत्र
सुरेख सुंदर गारा होतात
जमिनीवर येताच काचेच्या
मण्यांसारख्या त्या फुटून जातात
अंबरातून पावसाच्या
झरझर सरी कोसळतात
त्यांच्या दारावरती विजा
हट्टाने लोळण घेतात
चिमण्या आणि पाखरे
मुक्तपणे आभाळभर फिरतात
पाऊस पडू लागल्यावर
ती हळूच घरट्यात शिरतात
गगनावरती चंद्र आणि सुर्य
लपाछपीचा खेळ खेळतात
तारका आणि चांदण्याही
मग त्यांना येऊन मिळतात
गगनावरती माझे स्वास
एक भरारी मारतात
जीवनातली सारी दुःख
हळुवार बाजूला सारतात
- सौ संजिवनी संजय भाटकर :)