आई ---एक वर्तुळ ............. संजय निकुंभ
=============
आई
हे असं वर्तुळ आहे
कि तिच्या आसाभोवतीच
मन फिरत रहातं
माणूस कुठेही जावो
जगाच्या पाठीवर
ठेच लागल्यावर ओठी
तिचच नावं येतं
उदरात वाढवून स्वतःच्या
तीच मोठं करते
पिल्लास मोठं करण्यासाठी
तिची धडपड असते
पिल्लाचं पोटं भरण्यासाठी
जीवाचं रान करते
पिल्लासाठी स्वतःला
ती वाहून घेते
लहान असतांना मन
तिचा पदर धरून फिरते
मोठं झाल्यावरही
तिच्या मायेसाठी झुरते
जरी नसेल या जगात
तरी तिच्या आठवणीत रमते
तेव्हाही ठेच लागल्यावर
ओठी तिचेच नावं येते
म्हणून आई हे वर्तुळ आहे
असं मला वाटते
मरेपर्यंत तिच्या आसाभोवती
आपले मन फिरते .
===================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १८ . ८ . १३ वेळ : २ .४५ दु .