Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: सुरेश अंबादास सोनावणे..... on August 19, 2013, 10:29:46 AM

Title: हसत हसत जिवनाला संपवतोय मी.....
Post by: सुरेश अंबादास सोनावणे..... on August 19, 2013, 10:29:46 AM
का असा आठवणीत तुझ्या,

वेडापिसा होवूनी गुंतलोय मी.....

की स्वतःलाच तुझ्यात,

पुर्णपणे विसरलोय मी.....

तु येण्याआधी जिवनात माझ्या,

सारेकाही अगदी बरे होते.....

तुझ्यावर खरे प्रेम केले,

इथेचं जरा चुकलोय मी.....

तु भातुकलीचा खेळ समजून,

माझ्या भावनांनशी खेळून गेलीस.....

तुझ्यापायी स्वतःच्या अस्थित्वालाच,

नकळत मुकलोय मी.....

नाही पडणार पुन्हा प्रेमात कुणाच्या,

हसत हसत जिवनाला संपवतोय मी.....

हसत हसत जिवनाला संपवतोय मी.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....