Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Sadhanaa on August 27, 2013, 12:00:54 PM

Title: रात्रीच्या अंधारांत
Post by: Sadhanaa on August 27, 2013, 12:00:54 PM
रात्रीच्या अंधारांत
विचारांना फुटते पाऊल वाट
भावनांच्या सरितेला
मात्र त्यावेळी नसतात कांठ
रात्रीच्या अंधारांत
विचार आकुंचन पावतात
तेथे वासना फक्त
नेहेमी कारण वावरत असतात
रात्रीच्या अंधारांत
निर्बंध भावनांना पूर येतो
भावना न कामना
ह्यांचा कारण संगम होतो
रात्री जरी भावनांना
अपूर्व असे उधाण येते
कामनेच्या प्राबल्याने
भावना ही सापेक्ष बनते
वासने बरोबर विचार
ह्याचे प्रमाण व्यस्त असते
भावना  न कामना
हातांत हात घालून जाते
विचारांत नसते वासना
वासनेंत जेव्हां विचार असतो
भावना कामनांचा संगम
तेव्हांच सुखदायी ठरतो
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/inspirational-poem.html (http://www.kaviravi.com/2013/06/inspirational-poem.html)