माझ्या कविता मला कधीच नाही आवडल्या
कारण त्या नेहमी अपूर्ण असायच्या
तुझ्या जाण्यामुळे त्याही मला हिरमुसलेल्या दिसायच्या ....
शब्दांची दाटी असायची डोळ्यात दाटलेल्या पाण्यासारखी ..
कोमेजलेली फुलं अन त्यावरची पाखरं पोरकी ...
म्हणूनच माझ्या कविता मला कधीच नाही आवडल्या
कारण त्या नेहमी अपूर्ण असायच्या....
बरसणा-या सरी मला कोसळताना भासायच्या...
अवखळ लाटा अंगावर येताना दिसायच्या ...
जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहताना
पापण्या मात्र मिटलेल्या असायच्या ..
म्हणूनच माझ्या कविता मला कधीच नाही आवडल्या
कारण त्या नेहमी अपूर्ण असायच्या....
आठवणींची ती गर्दी अन मनात भरलेले काहूर ...
तुझी वाट पाहताना लागलेली हुरहूर ....
सा-या वेदना माझ्यावर हसताना दिसायच्या ...
म्हणूनच माझ्या कविता मला कधीच नाही आवडल्या
कारण त्या नेहमी अपूर्ण...........................
------पाउसवेडा
—
:) तुझ्या जाण्यामुळे त्याही मला हिरमुसलेल्या दिसायच्या ....Apratim..........KHup Chhan.......appreciate........all the best .........