Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: सुरेश अंबादास सोनावणे..... on September 16, 2013, 03:53:12 PM

Title: काय असतो विरह...!!
Post by: सुरेश अंबादास सोनावणे..... on September 16, 2013, 03:53:12 PM
काय असतो विरह,
आता काही कळत नाही.....

जीव जावा असे काही,
हल्ली घडत नाही.....

तडकलेल्या ह्रदयाचे,
अधुन मधुन चुकतात ठोके.....

जे आता पहिल्यासारखे,
कधीच स्पंदत नाही.....

उरले शेवटचे दोन क्षण हे,
जे अजुनही संपत नाही.....

चुकलो तर मीच होते तेव्हा,
तु कुठेच चुकली नाही.....

मी सर्वस्व मानले तुला,
मला तु थोडेही प्रेम दिले नाही..... :'( :'(

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १६-०९-२०१३...
दुपारी ०३,२१...
© सुरेश सोनावणे.....