वेड मनास येईना
.
.
जीवनाचा अर्थ माझ्या
शब्दाविन सापडेना
आत मनाशी शब्द भांडले
शब्द शब्दाला जुळेना
.
.
ते वेड माझे कधी मलाही
सोडून गेले कळेना
मन लोटले खाईत तरी
वेड मनास येईना
.
.
शुन्य त्या एकांत वेळी
शब्द जिवाचा सोबती
शब्दास तुझीच लकेर
ती किनार मला सापडेना
.
.
ते सुन्न माझे तरुणपण
ती आस माझी स्पंदेना
आत मनाचा कोंडवाडा
शब्द ओठांवर स्फुंदेना
.
.
रुतु बहरले पावसात
कंठ सुरांचा दाटेना
भावनांचा खेळ माझ्या
लेखनीतुन उमटेना
.
.
- विनोद पाटील
8)KHUPACH CHAAN AAHE KAVITA
nice...... :)
किरणजी, मिलींदजी खुप खुप धन्यवाद
सुंदर.स्पंदेना आणि स्फुंदेना या क्वचित आढळणार्या शब्दांचा सुंदर उपयोग
krishnakumarpradhanji dhanyavaad!!