भारतीय परंपरा
आम्ही भारतीय याचा अभिमान वाटला
कारण भारतीय संस्कृतीचा वारसा आम्ही जपला
आम्ही मनापासून खेळत होतो
धावांचा डोंगर रचत होतो
सहज पाहुण्याकडे द्रीष्टीक्षेप टाकला
त्यांचा आनंद होता मावळला
भारतीय संस्कृतीची जाणीव झाली
अतिथी देवो भवची आठवण झाली
पाहुण्यांना आनंद देण्याचा निश्चय केला
त्यांना धावांचा डोंगर रचू दिला
कर्णाचे वारस आम्ही याचा आठव झाला
त्यांनी फोर मारून विजय साजरा केला
त्यांच्या आनंदात आम्ही आनंद मानला
भारतीय संस्कृतीचा वारसा जपला
उगीच लोक ओरडा करतात संस्कृती विसरला
आणी आता जपली तर बोंब कशाला
कुमुदिनी काळीकर
Lol