Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: सतीश भूमकर on October 13, 2013, 06:50:13 PM

Title: सचिनच आमचा देव असेल
Post by: सतीश भूमकर on October 13, 2013, 06:50:13 PM
तो सामना बघण्यातच काय मजा असेल
जिथे खेळायला आमचा सचिनच नसेल

ते मैदानही आता सून सून असेल
जेव्हा दहा नंबरची छोटी आकृती मिस असेल

आता जरी तो थोडा थकला असेल
तरी क्रिकेट आमचा धर्म आणि
सचिनच आमचा देव असेल

@सतीश भूमकर