Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vinodi Kavita => Topic started by: Çhèx Thakare on October 17, 2013, 06:25:27 PM

Title: || आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही ||
Post by: Çhèx Thakare on October 17, 2013, 06:25:27 PM
||  आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही  ||
.
.
रोज आरश्या समोर आपला
अमूल्य वेळ खर्च करावा
चोपडून पावडर तोंडाला नूसतीच
चेहरा आपला साजेसा करावा
.
डिओ मारून अंगावर भसाभस
हिरो गिरी करत घराबाहेर पडावं
दिसता सूंदर रूपवान मूली
तिला नजरेनंच नूसतं छेडावं
.
कधी तिकडून आला पोसिटीव रिप्ले
आपण स्वप्नांचा दूनियेत ऊडावं
दोन शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी तिच्या सोबत
रोज तिच्या नजरेआडं च आपण पडावं
.
गाठून रस्त्यात तिला एकटी
आपल्या मनातलं बोलून द्याव
मी ओलरेडी एन्गेज आहे ऐकून
सालं मनाच खच्चीकरणचं होऊन जावं
.
जिला पहाव विचारून तिला
ति कूठेना कूठे तरी "पटलेली" असते
"मी एन्गेज आहे"  शब्द ऐकून
प्रेमाची पतंगच कटलेली असते
.
म्हणून बडबडतो स्वत:शी एक
कि प्रेमाच्या खेळात कधीच का मूरलो नाही
कारण आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही
आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही
.
.
©   Çhex Thakare
Title: Re: || आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही ||
Post by: सतीश भूमकर on October 17, 2013, 09:20:28 PM
 :D :D :D
Title: Re: || आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही ||
Post by: Çhèx Thakare on October 17, 2013, 11:07:20 PM
:)