तो क्षण
तो क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला
पावसाच काय तो नेहमी येतो
पण प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला
चांदण्यातही आता मला तिच दिसते
जणू तो चंद्र मला फसवून गेला
देवळातही दुसरे काही मागावे
नास्तिकाला तो श्रद्धाळ बनवून गेला
मी फक्त साधा चित्रकार होतो
अदृश्य रंगात मला तो रंगवून गेला
शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला
-------- राहुल पाटील