Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: भूषण कासार on December 03, 2013, 06:02:30 PM

Title: तरुणाई......
Post by: भूषण कासार on December 03, 2013, 06:02:30 PM
विचारशुन्य मनाने तरुणाई आज जगत आहे,
आपल्याच मदमस्तीत ती वाहत आहे,

दारु, गुटखा अन तंबाकु हेच त्यांच विश्व आहे,
आई वडीलांचा त्यांना विसर मात्र पडलाय,

ढोलकीच्या तालावर माकड जसा नाचतोय,
सिगरेटच्या धुव्यात तसा तरुणही उडतोय,

आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न तो बघतोय,
पण मार्ग मात्र चुकतोय....

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०