काही दिवस किती सुंदर असतात..
आठवणींच्या हिंदोळ्यात खूप वेळ घर करून राहतात..
काळ वेळ सरून सुद्धा ते लक्षात राहतात..
काही दिवस खरच किती सुंदर असतात..
निघून गेले असताना सुद्धा मनातल्या मनात आपल्या माणसाची भेट घडवून आणतात..
त्यांच्या सोबत घालवलेल्या क्षणांचा परत उलगडा करतात..
पुन्हा पुन्हा भेटावे सगळे म्हणून योगायोग जुळवून आणतात..
असे दिवस खरच सुंदर असतात..
धाकधूकीच्या काळात थोडा वेळ विश्रांती घालायला लावतात..
मनाच्या कोपऱ्यात असलेल्या आठवणींचा जागर मग घालत राहतात..
सुख आणि दुख यांची गोळाबेरीज करायला लावतात..
सरतेशेवटी डोळ्यातून पाणी आणून पुढचे दिवस आणखी सुंदर होण्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडतात..
काही दिवस खरच खूप खूप सुंदर असतात..
नितीन हरगुडे...