गावाकडे वाट जाते घेत नागमोडी वळण
आठवणीना येई उजाळा गतकाळ स्मरून
कित्येक वेळा गेली असेल ह्या वळणावरून
मायेचे होते सारे गेले ते दूर निघून
बाबाची प्रेमळ हाक अजून आहे स्मरणात
आजीच्या प्रेमळ स्पर्शाची ओल आहे मनात
शिक्षकाच्या छडीचा आवाज अजून घुमतो कानात
चिंचा, बोर ,आवळा, करवंद
चाखिला मी रान मेवा
रानात मौज झोपाळ्याची
किती गोड आठवणीचा ठेवा .
गावाकडे वाट जाते
आठवणी ह्या घेऊन
सुनिता .