Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Lyrics Swapnil Chatge on February 13, 2014, 08:00:49 AM

Title: का हा नवा दुरावा
Post by: Lyrics Swapnil Chatge on February 13, 2014, 08:00:49 AM
का हा नवा दुरावा,
भेटला माझ्या मला...
मन स्वत:ला ना सावरे,
आठवणीत तुझ्या या गुंतले...
मोहाच्या चार क्षणाला,
हे का आपलसे मानले...
का हा नवा दुरावा,
भेटला माझ्या मला,
तुझ्या त्या कातिल,
अदावर फिदा झालो होतो,
तुझ्या केसाच्या या,
सुगंधात मी हरवलो होतो...
का हा नवा दुरावा
भेटला माझ्या मला....
जीवनाच्या रस्त्यावर का
पुन्हा एकटा भटकलो,
का मी तुझ्या या
प्रेमात पडलो होतो,
का हा नवा दुरावा
भेटला माझ्या मला....
- स्वप्नील चटगे