Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Pravin Raghunath Kale on February 28, 2014, 01:58:01 PM

Title: वाट पाहतो पून्हा
Post by: Pravin Raghunath Kale on February 28, 2014, 01:58:01 PM
मीच का असा
वाट पाहतो पून्हा कसा
तिलाही वाटत असेल का
भास माझा हा असा

का घडलं का कशामुळे
हे सारंच बिघडले
सारवण्याचे यत्नही
इथेच का आटले

माझ्याच नशीबी
का ठपका बसला
प्रेमभंगाचा निशाणा
उरी का विसावला

एकटाच मी असा
दुःखी कष्टी होतो
मीच का असा
भावनाशून्य राहतो

का आटला झरा
तीच्या प्रेमाचा
तिलाही समजेल कधी
भावना ह्रदयाची

सावलीच्या माझ्या
मीच काढीन समजूत
शेजारची सावली तुला
का दिसत नाही

आयुष्याची सोबतीची
स्वप्न ती उराशी
भावनेच्या स्फोटात
वाद माझ्याच मनाशी


Pravin Raghunath Kale
8308793007