(https://images-blogger-opensocial.googleusercontent.com/gadgets/proxy?url=http%3A%2F%2F1.bp.blogspot.com%2F-zYDtIO_j5FI%2FUxbyINbJ8NI%2FAAAAAAAABjc%2FgTXPAZfMBAY%2Fs1600%2F205546_365411286886142_1190955283_n.jpg&container=blogger&gadget=a&rewriteMime=image%2F*) (http://1.bp.blogspot.com/-zYDtIO_j5FI/UxbyINbJ8NI/AAAAAAAABjc/gTXPAZfMBAY/s1600/205546_365411286886142_1190955283_n.jpg)
न सुखांची अपेक्षा होती
न जगण्याला कारण होते
आकाशाचे पंख मनाला
म्हणून सतत विचारांतच हरवत होते .............
मी एक उनाड पक्षी
मनातल्या मनात घर करणारं
कुणाच्या दुखांत आपले दुख पाहणारे
तर कधी त्याच्या चेहऱ्यावरचे अश्रू बनून वाहणारं
असाच आहे मी
थोडे थोडे म्रुत्युसमिप जाणारं
अन जाताना मात्र कुणाच्या आठवणींतून जगणारं
-
©प्रशांत डी शिंदे.....
दि.०५/०३/२०१४