घेऊन झेंडे रंग बिरंगी
येतील फिरुनी दारी
मते मागतील हात पसरुनी
लाज कुणाला नाही,
आली पहा हि निवडणुकीची घाई !
पाच वर्षे उलटून जाता
यांना लोक आठवण होई
कामे असता जनतेची
तोड दाखविणार नाही,
आली पहा हि निवडणुकीची घाई !
नाही उरती नाती गोती
सत्तेच्या स्वार्था पाई
मी मोठा? कि तू मोठा?
पैशात मोजला जाई,
आली पहा हि निवडणुकीची घाई !
©शिवाजी सांगळे