दूरवर बेभान ती
गेली सुखाला शोधत
चार मुक्त श्वासासाठी
पैसा पाणी उधळत
चार दिवस सुखाचे '
सारे काही विसरत
गंजलेल्या नात्यातून
सुटका करून घेत
मनातून पण तिला
होते सारेच माहित
आताचे हे सुख आहे
पेरॉलवरचे फक्त
बंदिशाळा तिची आहे
वाट तिकडे पाहत
शृंखलेच्या सवयीने
नि पाय अडखळत
विक्रांत प्रभाकर