वितभर पोटासाठी सगळेच जगतात
दोन तुकडे भाकरीपायी उपाशी कित्येक असतात
मोठ-मोठ्या लोकांना खायला नाही वेळ
दिवसभर शोधूनही तिला लागला नाही भाकरीचा मेळ
पोटासाठी मन किती बेइमान झाल,
शाळेतल कारटं त्यान कामाला लावल
भाकरीवर केली त्याने कित्येक दिवस चाकरी
भाकरीपायी त्याच माय मेली उपाशी बिचारी
रस्त्यातले भिकारी भाकरीसाठी भांडतात
अमिराचे लोक रोज किती सांडवतात
काहीजण खातात भाकरी जगण्यासाठी
काहीजण जगतात फक्त खाण्यासाठी .....
# सचिन मोरे#