काय तू समजतोस स्वतःला मीच सर्व काही
रे तुझ्या वाचून येथले काहीच अडणार नाही !
जी तुझ्या सवे राहिली "सावली" बनोनी
रे तुझ्या वाचून ती एकटी पडणार नाही
जमवतोस तू माया इथली पैका अडका
रे तुझ्या वाचून ते सारे काय सडणार नाही ?
जे केलेस कष्ट दिन-रात राब राबोनी
रे तुझ्या वाचून वारस तुझे भांडणार नाही?
जमविलेस तू येथे सगे सोयरे मित्र जीवाचे
रे तुझ्या वाचून ते तुझा ठाव-ठिकाणा पुसणार नाही?
तू कोण कुणाचा शोध हा तू घेशील का?
रे तुझ्या वाचून कोणी "तू कोण?" ते सांगणार नाही.
श्री. प्रकाश साळवी दि. ०३ मे २०१४.