Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: SONALI PATIL on May 20, 2014, 03:51:02 PM

Title: किती वियोग नात्या-गोत्यांचा.......
Post by: SONALI PATIL on May 20, 2014, 03:51:02 PM
  वियोग.......

स्मशानाच्या छातीवरती,रोज चीतेची होते होळी ।
का दुखःचा धूर  अन,अश्रुंचा पाट वाहतो ।
का मृत्यू रोज ताडंव घालतो,काहूर माजवतो दूखःचा ।
किती घरे,दारे किती मनपाखरे,अश्रू पुरात वाहून जाती ।
का व्याकूळ तेने पाहती जीवलगी ।
कुणाचा सौभाग्याचा धनी गेला,कुणा पोटचा गोळा ,
किती वियोग नात्या-गोत्यांचा ,
अर्ध्यावरती डाव मोडूनी,का नियतीने सूड उगवला ।
हे वादळ शांततेचे,शुकशूकाट अवती भोवती,
स्मशान शांतता का,
शाप बनूनी चीतेची धग रोज सोसती ।
शाप लागला आनंदाचा,रोज भरते प्रेत याञा ।
दुखःचा डोह पसरूनी,का अनंत वियोग आला ।
राख होते शरीराची,राख तन मनाची ।
फूले ऊधळती दूखःची,अश्रू ढाळूनी ।
अस्त होऊनी जीवनाचा, काळोखाच्या दिशेने अतं याञा,
पुन्हा न कधी दिसण्या साठी.....

   
Title: Re: किती वियोग नात्या-गोत्यांचा.......
Post by: कवि - विजय सुर्यवंशी. on May 27, 2014, 04:11:48 PM
शाप बनूनी चीतेची धग रोज सोसती ।[/size]शाप लागला आनंदाचा,रोज भरते प्रेत याञा ।
.
.
.
छान लिहलंय......