तू माझी कोण?
तू माझी कोण असणार नाही
ते प्रेम आता दिसणार नाही
गंध फुलांनी पसरून गेला
मी मात्र आता गंधणार नाही
जे दिले ते सर्व तू घेऊन जा
जे घडले ते सर्व विसरणार नाही
भेट तूझी माझी होणार नाही
भेटलीस कदाचीत तरी पहाणार नाही
केली असेल मी तुझ्याशी प्रीत ग
या पुढे सर्व मी ते आठवणार नाही
आणली थोडी फूले ही घेऊन जा
माळलास गजरा तरीही मी पहाणार नाही
शब्द सारे तूझे ते विसरून जा
शब्दांशी आता मी खेळणार नाही
श्री प्रकाश साळवी दि 21-06-2014