Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: विक्रांत on August 19, 2014, 09:38:03 PM

Title: शोधाच नाटक
Post by: विक्रांत on August 19, 2014, 09:38:03 PM
सारी शक्ती एकवटून
मोठी आशा धरून
मी निघालो होतो
तुझ्या शोधात ...
त्यांनी सांगितलेला
अन शिकवलेला
प्रत्येक प्रकार
करून पाहत ...
गावे पालथी घातली
तीर्थक्षेत्रे धुंडाळली
थकून भागून
आलो परत...
तू सापडला नाही
पण त्या शोधात
जे काही सापडलं
तेही कमी नव्हत...
ते कळाव म्हणून
तुझ्या शोधाच
नाटक कदाचित
रचल गेल होत

विक्रांत प्रभाकर