आठवणींचा काहूर उठला
सहनशिलतेचा बांध हि फुटला
सहवासातील क्षणांचा पाझर
अंतर्मनात दाटला ....
आठवणींचा काहूर उठला ...
डोळ्यांच्या पापण्यांवरती
अश्रूंचा सागर दाटला ...
कणखर माझ्या मनामध्ये
अलगद पणे आज हुंदका फुटला
आठवणींचा काहूर उठला ...।
क्षणभंगुर या आयुष्यातील
काळ सुखाचा लोटला...
आयुष्याच्या पानामध्ये ।
शब्द तुझा भेटला......
आठवणींचा काहूर उठला......
@दिप