आल्या आल्या कमळाबाई,संगे घेऊन
मोदीभाई ,
उद्धवाची वेगळीच घाई, मुख्यमंत्रीपद
सोडणार नाही,
राजू-जानकर मिटवून काही,
स्वतःलाही मिळते पाही, आठवलेंची आठवलेशाही,महायुतीशिवाय
राम नाही ,
पवारांची रे मस्तक घाई, १४४ला पर्याय नाही,
सोनियाबाई उपचार घेई ,हाताला तर वालीच
नाही ,
माकप भाकप कम्युनिष्ट दुष्काळाने ग्रासले काही, कि प्यायलाही पाणी नाही,
गांधीबाबा पितृपाठात वरतून हे सारे
पाही,अन ओरडून म्हणे सर्वाना हा भारत
माझा देश नाही!