जोडशाही...
बाण शेवटी सुटला
कमळ हि कोमेजले,
हात बधिर झाला
घडयाळ पण थांबले !
काय करावे कळेना
उरले अगतिक झाले,
वाटा देतील सत्तेत
त्यांसी नाते जोडले !
सत्तेसाठी खेळ सारा
कोणी नाही कुणाचा,
येउदेत निवडून कोणी
नाहीच कुणी मतदारांचा !
वाद कोणताही असो
मी तूझा तू माझा
जुना दोस्ताना आपला
कौल दे मतदारराजा !
© शिवाजी सांगळे