Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prernadayi Kavita | Motivational Kavita => Topic started by: शिवाजी सांगळे on October 08, 2014, 01:57:43 PM

Title: ना पाक...
Post by: शिवाजी सांगळे on October 08, 2014, 01:57:43 PM
ना पाक...

जन्मची ज्याचा, खोटयातून झाला,
भारतव्देश रक्तात, जन्मता भिनला !

सत्ताधारी तेच, रडगाणे गुणगुणला,
न आवाज शरीफ, युनोमधे रडला !

सीमे पलीकडून, हल्ले थांबायची,
कितीकाळ अजून, वाट पहायची ?

थकलोत ऐकूनी, त्याचर्चा आता,
सोडूनी सहिष्नुता, घालुया लाथा !

आक्रोषतो, मरतो, इथे सीमावासी,
तरीही म्हणतो, त्याआम्ही पडोसी !

आलेल्या बाॅम्बचा, हिशोब ठेवतो?
निषेध, चेतावण्या, आम्हीच देतो !

पळवयतेय सरकार, ती मिलिट्री,
प्रतिक्षेत आदेशाच्या, इथे मिलिट्री !

ठेवायचा हिशोब, किती हल्यांचा?
चला बदलुया, आकार नकाशाचा?

©शिवाजी सांगळे