निवडणूकीच्या काळात नेत्यांना
फुले, शाहू, आंबेडकर आठवतात
मतांसाठी प्रत्येकच पक्ष
महापुरूषांना हार फुले
घालून सजवतात
सत्तेच्या स्वार्थासाठी
छत्रपतीसाठी भांडतात
सगळेच पक्ष सत्तेसाठी
महापुरूषांची थट्टा मांडतात
कधीतरी त्याची स्मारक आठवतात
निवडणुकीच्या काळात
स्मारकही सजतात
किती दिवस चालणार
हे असलं, स्वार्थी
मतलबी राजकारण
या राजकारणामुळे
महापुरुष होतायेत
बदनाम विनाकारण
शेवटची एक विनंती
या राजकीय नेत्यांना
थांबवा हे सगळ
जनता झाली बेजार
बंद करा सगळे
मतलबी राजकारण
बदला हे सगळं
सांगड घाला विचारांची
करा प्रगती देशाची
साद घाला विकासाची
प्रगतीचा वारा
घोंगावू द्या
या द-या खो-यात
हा तिरंगा डौलाने
फडके द्या
जगाच्या नकाशात
प्रविण रघुनाथ काळे
8308793007