Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Shraddha R. Chandangir on October 19, 2014, 09:27:27 AM

Title: ♥ आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते ♥
Post by: Shraddha R. Chandangir on October 19, 2014, 09:27:27 AM
तुझ्या माझ्या break up ला आज वर्ष उलटून गेलं......
खरं प्रेम ज्याला आपण म्हणायचो ते कधीच हरपून गेलं
त्रास तुला झाला की मन माझं दुखायचं
जमणार मला नव्हतच, पण तुला सहज जाऊ दीलं.....

आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते
हसता हसता अचानक अश्रूंची साठवण होते....

भेट मला देण्यास तो गुलाब वीकत आणतो
गुलाब सारखी सुंदर तु असं नेहमी मला म्हणतो
गुलाबाला त्या बघून क्षणात मी विखुरते
वहीत वाळलेल्या गुलाबाकडे एकटक बघत बसते......

हात माझा हातात घेऊन तो तासनतास बोलत असतो
नजरेत तुझ्या दुसराच कोणीतरी, असं गमतीत बोलून बसतो
अक्कल कशी नाही रे तुला म्हणून मी ही त्याला रागावते
खोट्या रागाचा आव आणून नजरेतच तुला लपवते.....

मागे वळून बघताना मी तुझ्यात मला शोधते
शोधता शोधता स्वतःला परत तुझ्यात हरवते
हरवलेली मला बघून हाक त्याची येते
आज सोबतीला तो असतो, तरी आठवण तुझीच होते......
Title: Re: ♥ आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते ♥
Post by: priya shingre on October 29, 2014, 01:20:26 PM
wow....really nice
Title: Re: ♥ आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते ♥
Post by: Shraddha R. Chandangir on October 29, 2014, 01:26:49 PM
thnXx. ...
Title: Re: ♥ आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते ♥
Post by: ek anamika on November 20, 2014, 04:02:47 PM
janare khup dur jatat
tari papnyat pani detat.
visraych tari kas tyana
athawaninche var hot rahtat.

hradaysparshi.....
Title: Re: ♥ आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते ♥
Post by: Shraddha R. Chandangir on November 20, 2014, 04:13:11 PM
जाणारा कधीच थांबत नसतो
आणि दुरावा सतत लांबत असतो.
आठवण तर येते त्यालाही,
पण तो ती कधीच सांगत नसतो.
- अनामिका

Thnku ek anamika....  :)
Title: Re: ♥ आज सोबत तो असतो पण आठवण तुझीच येते ♥
Post by: सतिश on November 21, 2014, 06:11:47 PM
फारच छान..!!