माझ्या मना रं तू
घे जगण्याचा ठाव रं
अंधाराला सोडून तू
उजेडाकडे धाव रं ||
मेहनत नावाच
आपल आहे गाव रं
नशिबाचे दोर तोडून
जगा बरोबर धाव रं ||
कष्टाला फळ आहे
सोस जरा तू घाव रं
स्पर्धेत जर जिंकलास
तरच प्रगतीला वाव रं ||
तत्वज्ञानातूनच मिळेल
जगण्याचा ठाव रं
ज्ञानाचा आविष्कारानं होईल
इतिहासात नाव रं ||
आजच हे खुळ सोडून
मानवतेशी नात जोडा
उच्च-निच्चता सोडून
त्याला समते मध्ये मोडा ||
✒कवी - विराट शिंदे
9673797996