26/11 च्या शहिदांना श्रध्दांजली कविता
* बाबा तुमची आठवण येते *
बाबा तुमची आठवण येते
भरल्या डोळ्यांनी पापणी ओलावते
अंतरीचे दुख असे काहुर माजवते
जेव्हा आई तुमच्याविषयी सांगते
तुझे बाबा शुर पोलीस होते
अंगावरच्या खाकी वर्दीवर त्यांचे
आपल्याप्रमाणेच जीवापाड प्रेम होते
जनसेवेसाठीच ते नेहमी धडपडत होते
राञी कितीही उशीरा येउ दे घरी
पण तुला ते मिठीत घेत होते
हातांचा झुला करुन छकुले
तुला आनंदाने झुलवत होते
तु दहा महिन्यांची होतीस
सारे काही ठीक चालले होते
अन 26/11 ची काळराञ उगवली
माझ्या संसाराला ग्रहण लावुन गेली
नेहमीप्रमाणे तुझा मुका घेउन
ते आपल्या कर्तव्यावर गेले होते
तेव्हा मुंबईला अतिरेक्यांनी घेरलेलं होते
बेछुट गोळीबाराने निरपराध लोक मेले होते
मग तुझे बाबा त्या शैतानांशी
निधड्या छातीने भिडले होते
जरी घायाळ सारे अंग झाले
तरी अखेरच्या श्वासापर्यंत ते लढले होते
बाबा ऐकुन तुमची वीरगाथा
अभिमानाने मान आमची उंच होते
तुमचा अंश आहे मी
म्हणुन स्वताला धन्य समझते
पण तरीही बाबा क्षणोक्षणी
मला तुमची उणीव भासते
आईला दिसु नये म्हणुन
मी कोप-यांत जाउन रडुन घेते
बाबा तुमची आठवण येते...!
कवी-गणेश निंबाजी साळुंखे...!
मुंबई पोलीस
Mob-7710908264
Mumbai.
या कवितेत जिवंत भावना आहेत.. हृदयस्पर्शी...
सलाम त्या वीरांना...!