%% हाव %%( गझल)
मला सोसण्याला आता वाव नाही
तुझ्या काळजाचा इथे ठाव नाही
जरी आज वस्ती दिसे छान छोकी
ख-या माणसांना खरा गाव नाही
कुणी राव नाही इथे साव नाही
तुलाही कळाले मला भाव नाही
असे प्रेत माझे कुठे बोलले ते
तुझ्या लाकडांना आता ताव नाही
तुझी वाट होती जरी नागमोडी
तुला भेटण्याची मला हाव नाही
;)
गजाभाऊ चौगुले
(पेठ) वडगांव
९९७०२०९६३३