कधीतरी एकदा
कधीतरी एकदा जपावी एखादी आठवण
ह्रदयाच्या नाजूक कोपर्यात ठेवावी साठवून
कधीतरी एकदा व्हावे तल्लीन स्वप्नात
विसरुन वास्तवाला झेप घ्यावी गगनात
कधीतरी एकदा गुणगुणावी मंजूळ गाणी
अंतरातल्या भावनांना साथ द्यावी सुरांनी
दुःख विसरुन कधी एकदा व्हावे आनंदी
कधी विव्हळावे मन इतरांच्या वेदनांनी
कधी चांदण्यारात्रीत मनसोक्त विहरावे
कधी प्राजक्तापरि मनस्वी बहरावे
कधीतरी एकदा ओळख तू स्वतःला
जाणून घे तू कधी निसर्गाची जीवनशाळा
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com