(http://i62.tinypic.com/2pqjrio.jpg)
बंध
अवचित पाऊस आज
कसा हा आला?
एकच केवळ माझा
अश्रु थेंब ओघळला ।
भाव मनाचा त्याने
अचुक तो जाणला
जन्मा पासुन माझ्या
खुपदा तो बरसला।
बंध त्याचे माझे
कळलेच ना कुणाला
नाते हे परस्परांचे
उरले ते प्राक्तनाला।
© शिवाजी सांगळे