मनुवादाच्या जाळ्यात आजही मी धडपडतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !
भूताची भीती . . . . . येता अमावस
संकट येता . . . . . देवाला नवस
या पासून जरा लांबच राहतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !
जात नाही आता देव शोधण्या दूर
सोडून दिले आता अंगारा अन् शेंदूर
आता मी फक्त बुद्धमं शरणमं बोलतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !
नवसाला पावणारा देव
अन् हाकेला धावनारा देव
मी माणसातच शोधतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो ! !
लागत नाही आता तंत्र मंत्राच्या नांदी
लांबच राहतो दिसता साधु ढोंगी
मी बुद्धाचा आता छाती ठोकून सांगतो !
मी! . . . . मी बौद्ध बनण्याचा प्रयत्न करतो
संजय बनसोडे
मस्त.......त
धन्यवाद वैभव
Chaan sanjay... Buddha Che vichar... Vichar karnyas bhag padtat....
खुप सुंदर संजय सर
छान विचार आहेत आपले...
जयभिम
संजय सर अप्रतिम रचना
धन्यवाद - जयbभीम
धन्यवाद - जय भीम
संजय सर तुमची हि रचना खूपच अप्रतिम आहे . जय भीम .
Sundar....