Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vinodi Kavita => Topic started by: डॉ. सतीश अ. कानविंदे on January 10, 2015, 09:48:05 PM

Title: बंडखोर कवी
Post by: डॉ. सतीश अ. कानविंदे on January 10, 2015, 09:48:05 PM
 बंडखोर कवी
(२७ ऑक्टोबर १९९१ च्या 'लोकसत्ता' मध्यें प्रकाशित

एक कवी पेटून उठला
केले त्याने बंड
सूर्यावरती नेऊन ओतले
पाणी त्याने थंड

चंद्रावरचे डाग पाहून
मनातच तो हसला
दुस-या दिवशी जाऊन त्याने
रंग त्याला फासला

सूर्यमालेतील  सर्व ग्रह
पिशवीत त्याने भरले
समुद्रात त्यांना बुडवायचे
नक्की त्याचे ठरले

उपग्रहांनी गर्दी करून
अवकाश होते झाकले
लाथ मारून त्याने ते
पाडून सारे टाकले

फुंक मारून समुद्राला
शांत त्याने केला
पाण्यावरून चालत मग तो
जगप्रवासाला गेला
Title: Re: बंडखोर कवी
Post by: Ravi Padekar on September 24, 2015, 11:54:07 AM
khup chhan its can't imagine...
Title: Re: बंडखोर कवी
Post by: NARAYAN MAHALE KHAROLA on January 14, 2016, 03:24:20 PM
खूपच छान