ये गं ये तूर माय
तुझीच मले आस
बाकी साऱ्या पिकाने
केलाना माझा वनवास ! !
काय माय आणू दळून
अन् काय माय खाउ
पीक सार गेल वाळून
ना बघे माय सरकार भाउ
पळवला मेल्या पावसानं
तोंडचा माझ्या घास
ये गं ये तूर माय
तुझीच मले आस
बाकी साऱ्या पिकाने
केलाना माझा वनवास ! !
असा कसा माय पाऊस
ना फिटेना त्याची हाऊस
पावसाळ्यात नाही आला
आता भिजवला मेल्यानं कापूस
आता कापसाची पण माय वावरात सड़की रास हाय
ये गं ये तूर माय
तुझीच मले आस
बाकी साऱ्या पिकाने
केलाना माझा वनवास! !
माउले तूले आण हाय माझी
नको करूसना तू पण काशी
तू पण रागावलीस माय आसी
लेकरे उपाशी मरतील माझी
तू पण काय करशील
तुझ्या हाती तरी काय
ये गं ये तूर माय
तुझीच मले आस
बाकी साऱ्या पिकाने
केलाना माझा वनवास ! !
संजय बनसोडे