नभाआड लपला चंद्र
नभात चांदणी आहे,
अजुन घे बोलून थोडे
रात अजुन थोडी आहे...
ठिकाण माझे पुसू नका
विश्वासात माझा सहवास आहे,
धर्म माझा मानवता
अन् माणुसकी माझी जात आहे...
सहाणुभूती कसली त्यांची
तो तर एक घातच आहे,
झोपू नका पिडीतांनो
वैऱ्याची ही रात आहे...
प्रतिष्ठेचा बडेजाव
मिटविणे प्रघात इथे आहे,
जरी उपेक्षित मी
तुझीच रसिका साथ आहे....
- गणेश म. तायडे
खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com
खूपच छान